Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : दहा घरफोडीच्या गुन्ह्यातील विधीसंघर्षित बालक ताब्यात; पोलिसांनी मुद्देमाल केला हस्तगत

Dhule News : धुळ्याच्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गरताड बारी परिसरात संशयास्पद इसम असल्यासंदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला

भूषण अहिरे

धुळे : धुळे तसेच परिसरात मागील काही दिवसात घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा तपास करताना (Police) पोलिसांनी घराफोडी करणाऱ्या टोळीतील विधी संघर्षित (Dhule) बालकाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. (Maharashtra News)

धुळ्याच्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गरताड बारी परिसरात संशयास्पद इसम असल्यासंदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे (Dhule Police) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी असलेले चार इसम हे त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र येथे एक विधी संघर्शीत बालक हा पोलिसांना आढळून आला आहे. त्या विधी संघर्शीत बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ लाख ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने जवळपास दहा घरफोडी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यातील काही घरफोड्या या इतर जिल्ह्यातील असल्याचे या तपासातून निष्पन्न झाले आहे. त्या ठिकाणाहून पोलिसांनी काही संशयास्पद वस्तू देखील ताब्यात घेतल्या असून, जवळपास एक लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT