Dhule Politics Saam Tv
महाराष्ट्र

Dhule Politics: भाजपच्या खेळीनंतर धुळे लोकसभा निवडणुकीत 'पाटील विरुद्ध पाटील' सामना रंगण्याची चिन्ह

Dhule Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे धुळे लोकसभा काबीज करण्यासाठी मोठी खेळी खेळण्यात आली आहे. धुळ्यात भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना जर डच्चू मिळाला, तर काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'पाटील विरुद्ध पाटील' असा सामना धुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान बघावयास मिळण्याची शक्यता आहे.

Rohini Gudaghe

भूषण अहिरे

Subhash Bhamre Vs Kunal Patil

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले (Dhule) आहे. लोकसभा काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षातर्फे कंबर कसली जात आहे. त्यातच भाजपतर्फे धुळे लोकसभा काबीज करण्यासाठी मोठी खेळी खेळली जात असल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. धुळे लोकसभेवर दहा वर्षांपासून भाजपचा झेंडा फडकत आहे. गेल्या दहा वर्षांपासून खासदार सुभाष भामरे हे सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून आले (Lok Sabha Elections) आहेत. परंतु, यावेळी मात्र खासदार सुभाष भामरे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह काहीशी दिसत नाहीये. परंतु खासदार सुभाष भामरे यांनी पक्षश्रेष्ठींवर, आपल्या कामावर तसेच जनतेवर आपला विश्वास असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मान्य असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. (latest marathi news)

त्यामुळे धुळे लोकसभा काबीज करण्यासाठी भाजपतर्फे मोठी रणनीती आखण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू (Dhule Politics) आहेत. यावेळी धुळे लोकसभा काबीज करण्यासाठी भाजप काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेससमोर मोठा प्रश्न

यासाठी भाजपतर्फे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून समीकरण रचले जात असल्याचं बोललं जात आहे. कारण काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर सुतगिरणीवर गेल्या काही महिन्यांपूर्वी तपास यंत्रणांची छापेमारी झाली (BJP Subhash Bhamre) होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर काँग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करावी, यासाठी विचारणा झाली. परंतु, काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक आपण लढणार नाही, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे.

गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान आमदार कुणाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढवली (Lok Sabha Elections 2024) होती. यावेळी देखील भाजपसमोर आमदार कुणाल पाटील हे मोठं आव्हान होतं. परंतु, आता आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं सांगितल्यानंतर आता काँग्रेससमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा

महाविकास आघाडीतर्फे आता ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार, हे अद्याप निश्चित झालं नाही. तरी देखील, माजी आमदार शरद पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे इच्छुक आहेत. राजकीय वर्तुळात देखील त्यांच्या नावाची चर्चा सुरू (Dhule News) आहे. आमदार कुणाल पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याने आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत का? त्यांना भाजपतर्फे उमेदवारी करण्यासाठी गळ घातली जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरून आहे.

आमदार कुणाल पाटील यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देऊन उमेदवारी जर देण्यात आली तर भाजपतर्फे आमदार कुणाल पाटील, महाविकास आघाडीतर्फे शरद पाटील (MVA Sharad Patil) उमेदवारी करतील, असंच काहीसं चिन्ह आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 'पाटील विरुद्ध पाटील' असाच सामना धुळेकरांना बघावयास मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीस आमदार कुणाल पाटील हे उपस्थित नसल्याने कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT