Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत काय ठरलं? वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंनी सर्वकाही सांगितलं

Maha vika aghadi meeting in mumbai : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे देखील होते. त्यांनी बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली आहे.
Siddharth Mokale
Siddharth Mokale Saam tv
Published On

आवेश तांदळे, मुंबई

Maharashtra Political News :

महाविकास आघाडीची आज बुधवारी महत्वाची बैठक मुंबईतील हॉटेल फोर सिझन्स येथे झाली. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे देखील होते. त्यांनी बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे काय म्हणाले?

बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं की, 'महाविकास आघाडीला ओबीसी समाजाला लोकसभेत ४८ पैकी १५ जागा दिल्या पाहिजेत, असा प्रस्ताव दिला होता. यावर चर्चा होऊ शकली नाही. तसेच तीन उमेदवार अल्पसंख्याक समाजातील असावेत, या मुद्द्यावरही चर्चा झाली नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी मविआ एकत्र लढत आहे. भाजपसोबत निवडणुकीच्याआधी किंवा निवडणुकीनंतर समझोता, युती आघाडी करणार नाही असे लेखी वचन घटक पक्षांनी द्यावे, असाही प्रस्ताव दिला होता. त्यावरही चर्चा झाली नाही'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Siddharth Mokale
Congress Manifesto : रोजगार ,महागाईपासून सुटका ते सामाजिक न्याय; लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार

मोकळे पुढे म्हणाले की, 'जेवणाचा ब्रेक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी आघाडीसोबत आहे. पण मला वाटतंय की, आघाडीच माझ्यासोबत नाही. ही आघाडी व्हावी आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी. भाजपाचा पराभव या आघाडीने करावा. माझी अकोल्याची जागा द्यायला मी तयार आहे. तुम्ही काही बोला आणि तोडगा काढा, आपण पुढे जाऊ'.

Siddharth Mokale
Pune Politics: लोकसभा निवडणुकीच्याआधी काँग्रेस नेत्याचा "लेटर बॉम्ब"; अंतर्गत धुसफूस आली चव्हाट्यावर

'महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्हाला काय देणार, कुठल्या जागा देणार, जागेच्यासंदर्भात कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. महाविकास आघाडीने आम्ही दिलेले प्रस्ताव आणि जागेच्या संदर्भात वेळ मागून घेतली आहे. पुढच्या आठवड्यात बसून चर्चा करु, असं आघाडीकडून सांगण्यात आलं. आता काहीतरी चांगलंच होईल, असं मोकळे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com