Dhule News:  Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: महिला अधिकारीच्या मुलाचा धक्कादायक प्रताप; वाढदिवसाला हॉस्टेलमधील मुलींना रात्री हॉटेल अँड बारमध्ये नेलं

Dhule News: साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील आदिवासी मुलींच्या हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.

भूषण अहिरे

Dhule News:

धुळ्यातील साक्रीत धक्कादायक घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील आदिवासी मुलींच्या हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉस्टेलमधील हा धक्कादायक प्रकार आदिवासी संघटनांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या घटनेने तालुक्यातील पिंपळनेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याच्या पिंपळनेरमधील आदिवासी मुलींच्या हॉस्टेल प्रशासनाचा धक्कादायक प्रकार आदिवासी संघटनांनी समोर आणला आहे. मुलींच्या हॉस्टेलमधील महिला अधिकारीच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉस्टेलमधील मुलींना चक्क रात्रीच्या वेळी हॉटेल अँड बारमध्ये नेण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुलींच्या हॉस्टेलमधील महिला पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासगी कार्यक्रमासाठी रात्रीच्या वेळी मुलींना हॉटेल अँड बारमध्ये नेल्याने आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेवरून हॉस्टेलमधील मुलींची सुरक्षा धोक्यात आणल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची संघटनांनी केली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर या मुलींच्या हॉस्टेल बाहेर आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक होत आंदोलन सुरु केलं आहे.

या घटनेवरुन आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेराव घालत याबाबतचा जाब विचारला आहे. या संबंधित महिला अधिकारीच्या निलंबनाच्या मागणीसाठी हॉस्टेल बाहेर आदिवासी संघटनातर्फे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, या हॉस्टेलच्या प्रशासनाकडून या घटनेवर बोलण्यासही कोणी समोर आलेलं नाही. तसेच घटनेबाबत हॉटेल प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Burger E-COLI: एक बर्गर करेल तुमचा घात?बर्गरमधील E-COLI जीवाणूमुळे एकाचा बळी

Assembly Election: मविआत शंभरी कोणाची? जागावाटपावरुन मविआत रस्सीखेच

Maharashtra Election: संजय शिरसाट यांना ठाकरेंच्या राजू शिंदेंचं आव्हान; संभाजीनगर पश्चिमचा गड राखणार?

Congress vs BJP Clash : नगरमध्ये विखे-थोरात वाद टोकाला; अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, VIDEO

Border Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री, तर स्टार खेळाडू बाहेर

SCROLL FOR NEXT