Kolhapur Crime News : मुलीचं लग्न प्रियकरासोबत होऊ नये यासाठी कुटुंबियांचं भयंकर कृत्य; अख्ख गाव हादरलं, गुन्हा दाखल

Kolhapur News : भोंदू बाबासह चौघांविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSaam TV
Published On

रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापुरातील आजरा तालुक्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलीचं प्रेम संबंध असलेल्या युवकाशी लग्न होऊ नये यासाठी जादूटोणा व अघोरी प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राहुल पवार याने आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोंदू बाबासह चौघांविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल पवार त्याच्याच गावात राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघांच्या प्रेमसंबंधाविषयी दोन्ही कुटुंबियांना माहिती होती. मात्र मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे आपल्या मुलीचं लग्न राहुलशी होऊ नये यासाठी रेश्मा बुगडे, शामराव बुगडे यांनी जादूटोण्याचा मार्ग पत्करला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kolhapur News
Kolhapur News: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग, मुलाचं आईसोबत भयानक कृत्य; मन सुन्न करणारी घटना

प्रियकर राहुल लग्नाची मागणी घालण्यासाठी त्याचे नातेवाईक आणि गावातील प्रतिष्ठित लोकांसह बुगडे यांच्या घरी गेला होता. मात्र मुलीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला. काहीतरी कामधंदा कर मग लग्नाचे बघू असे त्याला सांगितले. दरम्यान मुलीचं लग्न राहुलशी होऊ नये यासाठी बुगडे कुटुंबियांनी एका भोंदूबाबाच्या मदतीने जादूटोणा सुरु केला. त्याचाच एक भाग म्हणून २९ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता गावातील स्मशानभूमीत जाऊन काहीतरी पुरल्याचे फिर्यादीच्या मित्रांनी राहुलला सांगितले. (Latest News)

Kolhapur News
Yavatmal News: मॉर्निंग वॉकला निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; कारच्या धडकेत शिक्षकासह माजी सरपंचाचा मृत्यू

स्मशामनभूमीत काय पुरले पाहण्यासाठी राहुल गेला. तेथे आपला फोटो व मुलीचा फोटो लिंबू व चंदेरी रंगाचा कागद असे साहित्य पुरून त्यावर एक अंडे दारू ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर पुन्हा २८ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता सुमारास कोवाडे मार्गावर रेश्मा बुगडे यांनी मरगुबाई मंदिराच्या बाजूच्या जंगलात जिवंत कोंबडी अंडे व एक काळे बाहुले झाडावर लटकवलेले आढळले.

यानंतर राहुल पवार याने आजरा पोलिसात जाऊन तक्रार दिली. यानुसार भोंदूबाबासह चौघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com