महाराष्ट्र

धुळ्याची लालपरी झाली हायटेक..७८७ बसला जीपीएस सिस्टिम

साम टिव्ही ब्युरो

भूषण अहिरे

धुळे : बदलत्या काळाप्रमाणे आता लालपरी देखील हायटेक होत आहे. राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या धुळे विभागातर्फे जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर जाणारे तब्बल ७८७ वाहनांना जीपीएस सिस्टिम लावण्यात आली आहे. या सिस्‍टीममुळे प्रवाशांची तासन्‌तासा ताटकळत बसची वाट पाहण्याची वेळ संपणार आहे. (dhule-devison-msrtc-787-bus-gps-tracking-systeme-start)

प्रवाशांना आता आपल्याला ज्या बसमध्ये प्रवास करावयाचा आहे; तिला आपल्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हे समजू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचण्यास मदत होणार असून परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील डेपोमधून मार्गस्थ झालेली बस आता कुठल्या ठिकाणी आहे. हे ऑफिसमध्ये बसल्या जागेवर समजू शकणार आहे.

बसचा वेग वाढला तरीही...

त्याचबरोबर बस चालकाने बसचा वेग जरी वाढवला, तरी याची संपूर्ण माहिती ऑफिसमध्ये बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजू शकणार आहे. तो वेग कंट्रोल करण्याच्‍या सुचना बसचालकाला देता येतील. त्यामुळे भरधाव वेगामुळे होणारे बसचे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. एखाद्या बसचा अपघात झाल्यास ती बस कुठल्या ठिकाणी अपघातग्रस्त झाली आहे. याबाबतची माहिती कार्यालयमध्ये बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ समजणार असल्यामुळे अपघातग्रस्त वाहनाला मदत पुरवण्यासाठी देखील परिवहन विभागाला जीपीएस प्रणालीची मदत होणार आहे.

स्‍थानकात मोठ्या स्क्रीनवर लोकेशन

आपल्या बसस्थानकावर लावलेल्या स्क्रीनवर प्रवाशांना आपल्या बसचे लोकेशन समजू शकणार आहे. त्यामुळे बसला स्थानकावर येण्यास किती वेळ लागेल व आपणास बसस्थानकावर आणखी किती वेळ थांबावे लागेल हे आता प्रवाशांना सहजपणे समजू शकणार आहे. अशा पद्धतीच्या स्क्रीन धुळे जिल्ह्यातील तब्बल नऊ मुख्य बस स्थानकांवर बसविण्यात आले आहेत.

मोबाईल ॲपवरही पाहता येईल लोकेशन

त्यानंतर प्रवाशांच्या मोबाईलवर ॲपद्वारे जीपीएस सिस्टिमच्या मदतीने घरबसल्या आपली बस किती वाजता कुठे असेल याचा अंदाज सहजपणे लावता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनो झाली की नाही आपली लाल परी खऱ्या अर्थाने हायटेक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कोल्हापुरात शरद पवार गटाच्या जयकुमार शिंदेंनी दिला राजीनामा

Solo Trip: लग्नानंतर सोलो ट्रीपला जाण्याचे फायदे जाणून घ्या ?

T-20 World Cup 2024: T-20 WC स्पर्धेतील सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर! टीम इंडिया या संघासोबत करणार दोन हात

Effects of Fruit Juice: उन्हाळ्यात फळांचा ज्यूस पिताय? जाणून घ्या दुष्परिणाम

Pune Crime News: पुण्यामध्ये पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरचौकात ६ जणांनी तरुणांची केली निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT