Social Media Account Ban Saam Tv
महाराष्ट्र

Social Media Account Ban : सोशल मीडियातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; धुळ्यात तिघांवर गुन्हा

Dhule Social Media Account Ban : धुळे जिल्ह्यात सोशल मीडियावर वादग्रस्त आणि आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या तीन अकाउंट धारकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Alisha Khedekar

सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रकरणात धुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तीन सोशल मीडिया अकाउंट धारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील यवत मध्ये काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका वादग्रस्त पोस्टवरून मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहताच राज्यभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सायबर शाखेने सोशल मीडियावर सतत नजर ठेवत तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान तीन वेगवेगळ्या अकाउंटवरून काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हे व्हिडिओ समाजात भय व तणाव पसरवण्याचा उद्देश ठेवून पोस्ट करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तिन्ही अकाउंट धारकांविरोधात गुन्हे दाखल केले.

या कारवाईची दखल स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी घेतली असून, त्यांच्या आदेशानुसार तात्काळ गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांकडून या प्रकाराला दुजोरा देत सांगण्यात आले की, समाजात जातीय तेढ, हिंसाचार किंवा सार्वजनिक शांततेला धोका पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या पोस्ट्सवर पोलिसांची करडी नजर आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकारामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांनी जबाबदारीने सोशल मीडिया वापरावा, असे आवाहन पोलिसांनी पुन्हा एकदा केले आहे.

धुळे जिल्ह्यातील ही घटना नेमकी काय होती?

धुळे येथे तीन सोशल मीडिया अकाउंट धारकांनी समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ पोस्ट केले होते, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

ही कारवाई कशाच्या पार्श्वभूमीवर झाली?

पुण्यातील यवतमध्ये काही दिवसांपूर्वी वादग्रस्त पोस्टमुळे तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे राज्यभर पोलीस सतर्क झाले.

पोलिसांनी नेमकी कोणती माहिती दिली आहे?

संबंधित अकाउंटवरून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे व्हिडिओ शेअर करण्यात आले होते, ज्यामुळे समाजात भीती निर्माण होण्याचा धोका होता.

नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी?

पोलिसांनी आवाहन केले आहे की, सोशल मीडिया जबाबदारीने वापरावा आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नयेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, कोकण - घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट; इतर ठिकाणी काय परिस्थिती?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या 75 शाळा होणार मॉडेल स्कूल

Success Story: शाळेसाठी रोज १० किमीची पायपीट, सलग दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS वीर प्रताप सिंह यांचा प्रवास

Ardhakedra Yog: बुध-गुरु बनवणार दुर्मिळ राजयोग; 3 राशींच्या व्यक्तींची होणार एका रात्रीच चांदी

Friday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या मागे कटकटीची पीडा; आर्थिक ताण वाढणार, जाणून घ्या शुक्रवारचा दिवस कसा असणार?

SCROLL FOR NEXT