Dhule Crime Saam Tv
महाराष्ट्र

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

Dhule Crime: धुळ्यामध्ये लग्नसमारंभात आज भयंकर घटना घडली. नातेवाईकांमध्ये वाद झाला. या वादात ८ जणांवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

Priya More

Summary -

  • पिंपळनेर येथे लग्नसोहळ्यात धारदार शस्त्राने हल्ला

  • ८ जणांवर चाकूने सपासप वार करण्यात आले

  • या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले

  • गुजरात बॉर्डरवरून ३ आरोपींना अटक करण्यात आली

धुळ्याच्या पिंपळनेर येथे लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार घडला. लग्नसोहळ्यात ८ जणांवर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ३ हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

पिंपळनेर वऱ्हाडी हत्या प्रकरणानंतर पिंपळनेर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळात आहे. लग्न मंडपात झालेल्या राड्यानंतर ३ जणांची धारदार शास्त्राने हत्या करून पसार होणाऱ्या ३ आरोपींच्या पिंपळनेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांनी लग्न मंडपात तीन वऱ्हाडींची हत्या करून घटनास्थळावरून पोबारा केला होता. पिंपळनेर पोलिसांनी गुजरात बॉर्डर घाटामध्ये स्थानिकांच्या मदतीने ट्राफिक जाम करून या तिन्ही मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रात्री उशिरा भेट देऊन या संपूर्ण परिस्थितीची माहिती जाणून घेतली आहे आणि या ३ मारेकऱ्यांच्या विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित सर्व आरोपींना लवकरात लवकर गजाआड केले जाईल असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे. या हत्याकांडाच्या घडेमुळे धुळे हादरले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

घडलं असं की, धुळे येथील पिंपळनेर येथे नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नसोहळ्यात ही घटना घडली आहे. साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनचा वाद होता. तसेच साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ शेअर केल्याने तणाव वाढला होता. त्या वादातूनच लग्नसोहळ्यात अचानक संतापलेल्या काही जणांनी धारदार शस्त्राने ८ जणांवर हल्ला केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर ५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार

Silent Heart Attack Warning: सायलेंट हार्ट अटॅक ओळखा! झटका येण्यापूर्वी शरीरात होऊ लागतात हे बदल

Pune Crime: कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार, विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करत तरुणाची आत्महत्या; पुणे हादरले

PM Kisan Yojana: ९.३२ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आज खात्यात जमा होणार ₹२००० ; त्याआधीच कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Accident News : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, भरधाव टेम्पोची कारला धडक; महाराष्ट्रातील ३ जणांचा राजस्थानमध्ये मृत्यू

SCROLL FOR NEXT