Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधारात नेत तरुणाला मारहाण; मोबाइलसह रोख रक्कम घेऊन पसार

Dhule News : दुचाकीवरून बसवून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत नेले. यानंतर अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवून दोन दुचाकींवरील चारही जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली

Rajesh Sonwane

धुळे : रस्त्याने एकट्या जात असलेल्या तरुणाला दुचाकीवर आलेल्या दोघांनी लिफ्ट देण्याचे सांगत गाडीवर बसविले. काही अंतरावर पोहचल्यानंतर अंधारात तरुणाला हल्ला करत मारहाण केली. यानंतर त्याच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला. तसेच फोन पे द्वारे रक्कम देखील ट्रान्सफर करून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी धुळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धुळे शहरात सदरची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत जुने धुळे (ता. धुळे) येथील अजय आनंदा मोरे (वय २७) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सदर घटना शहरातील हॉटेल चंद्रपजवळील कच्च्या रस्त्यावर रात्री सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी अजय मोरे हे रस्त्याने जात असताना मागून दुचाकीवर दोघेजण आले. त्यांनी गाडीवर बसा सोडून देतो असे सांगितले. 

मारहाण करत मोबाईल, खिशातील रक्कम घेतली काढून 

त्यानुसार संशयितांनी अजय मोरे याना दुचाकीवरून बसवून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत नेले. यानंतर अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवून दोन दुचाकींवरील चारही जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्याला टोकादार हत्याराचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. मारहाणीनंतर खिशात असलेले तीन हजार रुपये रोख, मोबाईल हिसकावून घेतला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल 

संशयित एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मोबाईलमधील फोन पेचा कोड जबरदस्तीने विचारून त्याच्या खात्यातून ७ हजार २०० रुपये स्वतःच्या फोन पेवर टाकून घेतले. दरम्यान घडल्या प्रकरणानंतर अजय मोरे यांनी धुळे शहर पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT