Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

दुकानातील कामगारांनीच केला विश्‍वासघात; ७२ लाखांचे दागिने लुटले

भूषण अहिरे

धुळे : सात ते आठ वर्षांपासून विश्वासू म्हणून सराफ दुकानात कामाला असलेल्या कामगारांनीच विश्वासघात करत दुकान मालकाला 72 लाखांच्या सोने व चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत राजस्थान येथील दोन्ही संशयितांविरुध्द आझादनगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule crime news shop workers Jewelry worth Rs 72 lakh theft)

महिन्याच्या अखेरीस दुकानातील (Dhule News) सर्व सोने व चांदीचा स्टॉकची मोजणी करण्यात येते. या दरम्यान दुकानात उपलब्ध असलेल्या सोन्या-चांदीच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात घट आल्याचे दुकान मालकास समजले. त्यावरून दुकानामध्ये सोन्या चांदीचे वस्तू चोरीला गेल्या असल्याची खात्री दुकान मालकाची झाली. त्यानंतर ज्या दोघा विश्वासू कामगारांवर या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जबाबदारी सोपवली होती; त्यांनीच ही चोरी केली असल्याचे उघडकीस आले.

एकाने केली आत्‍महत्‍या

या दोघांपैकी एका चोरट्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तर दुसरा चोरटा राजस्थान येथील असून सध्या तो फरार असून आझादनगर पोलिस आता या संदर्भातील पुढील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Today's Marathi News Live : मी देखील विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पावलं उचलणार; उज्वल निकम

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

SCROLL FOR NEXT