Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : पूजा बागुल हत्या प्रकरण; धक्कादायक माहिती आली समोर, पतीने दिली होती मांत्रिकाला सुपारी

Dhule News : पत्नी पूजा हिला पेस्टिसाइड इंजेक्शन देत जीवे मारले होते. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून पत्नीची हत्या करण्यापूर्वी पतीसह सासरच्या मंडळींनी मांत्रिकाला सुपारी दिली होती

Rajesh Sonwane

धुळे : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या कपिल बागुल याने प्रेयसीसाठी पत्नी पूजा उर्फ शारदा हिला विषारी इंजेक्शन देऊन हत्या केल्याची घटना १ जूनला घडली आहे. मात्र या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून पत्नीचा खून करण्यापूर्वी पतीने एका मांत्रिकाला हाताशी धरून त्याला पत्नीवर करणी करण्याची सुपारी दिली होती. यासाठी दीड लाख रुपये देखील दिले होते.

धुळे शहरातील वलवाडी परिसरात सदर खुनाची घटना १ जूनला घडली होती. सैन्य दलातील कपिल बागुल याने महाविद्यालयीन मैत्रिणीसोबत असलेल्या संबंधाची माहिती पत्नी पूजा हिला समजली होती. यातून पत्नी पूजा उर्फ शारदा हिला पेस्टिसाइड इंजेक्शन देत जीवे मारले होते. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून पत्नीची हत्या करण्यापूर्वी पतीसह सासरच्या मंडळींनी मांत्रिकाला सुपारी दिली होती.

दोन वेळेस फसला प्रयत्न  

लष्करात नोकरीला असलेल्या कपिल बागुल याने पत्नी पूजा हिचा खून करण्यासाठी कथित मांत्रिक भूषण काळे याला सुपारी दिली होती. शिवाय त्यासाठी कपिल, त्याची आई विजया व प्रज्ञा यांनी सुमारे दीड लाख रुपये दिले होते. मात्र दोन वेळा करणीचा डाव फसल्यामुळे मांत्रिक भूषणकडे पैशांची मागणी होऊ लागली. त्यामुळे भूषणने सचिन जाधव, जयेश जगताप व दोन अल्पवयीन मुलांना हाताशी घेऊन खुनाचा कट रचला. 

मांत्रिकासह अन्य एकजण पोलीस कोठडीत 

दरम्यान मांत्रिकाने पेस्टिसाइड, इंजेक्शन, सलाइन आणले होते. पूजाच्या घरी जाऊन तिला इंजेक्शनने पेस्टिसाइड दिले. यानंतर तिच्या मृत्यूची वाट पाहण्यात आली. यावेळी तिच्या डोक्यावर टणक वस्तूने वार देखील केले होते. हे संपूर्ण खून प्रकरण पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तुषार देवरे, उपनिरीक्षक साईनाथ तळेकर व पथकाने उघडकीस आणले होते. आता पूजा उर्फ शारदा बागुल खून प्रकरणातील कथित मांत्रिकासह अन्य एकाची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसे निर्देश धुळे न्यायालयाने दिले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

SCROLL FOR NEXT