Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरी; सहा तासांत चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : मंदिरातून चोरी करून पडून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अवघ्या सहा तासात या दोन्ही चोरट्यांना पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले, दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील गजानन कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली होती. दानपेटी चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत गजाआड केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 

मंदिरातील दानपेटी तसेच देवाच्या अंगावरील दागिने चोरी करण्याकडे चोरट्यानी मोर्चा वळविला आहे. रात्रीच्या अंधारात सुमसाम असलेल्या मंदिरात प्रवेश करत चोरटे चोरी करून पसार होत आहेत. अशीच घटना धुळे शहरातील गजानन कॉलनीत घडली आहे. या परिसरातील गजानन महाराज मंदिरात दोघांनी प्रवेश करत मंदिरात असलेली दानपेटी चोरून नेली होती. दरम्यान सकाळी भाविकांच्या हा प्रकरण लक्षात आला होता. 

पाठलाग करून दोघांना पकडले 
यासंदर्भात फिर्याद मिळाल्या नंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. यानंतर गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अरिहंत मंगल कार्यालयाजवळ सापळा रचून मोटारसायकलवरून पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले. साहिल सत्तार शाह व सोहेल आरिफ शाह अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  

दोघांनी दिली गुन्ह्याची कबुली 

पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून मंदिरातून चोरलेली दानपेटी आणि गुन्ह्यात वापरलेली एक चोरीची मोटारसायकल असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : आईच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू; खेळत असलेल्या चिमुकलीला भरधाव रिक्षाने उडविले

Raj-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पहिल्यांदाच 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं घेतलं सहकुटुंब दर्शन; पाहा VIDEO

Monsoon sports injuries: पावसाळ्यात मुलांमध्ये वाढतोय ऑर्थोपेडिक दुखापतींचा धोका; काळजी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन

Marathi Celebrity Ganpati 2025 : स्वप्नील जोशी ते अमृता खानविलकर; मराठी कलाकारांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन, पाहा PHOTOS

चिमुकलीचा पहिला वाढदिवस, घरात पाहुणे -रावळेंची गर्दी; क्षणात बिल्डींग कोसळली, आई अन् चिमुरडीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT