Dondaicha News Saam tv
महाराष्ट्र

Dondaicha News : बंद घरात धाडसी चोरी; चार लाखांचे दागिने लंपास

Dhule News : बंद घरात धाडसी चोरी; चार लाखांचे दागिने लंपास

साम टिव्ही ब्युरो

दोंडाईचा (धुळे) : घराला कुलूप लावून सर्व मंडळी अहमदनगरला गेले होते. या दरम्यान घर बंद असल्याचा (Dondaicha) फायदा घेत दरवाजा तोडून चोरट्यांनी सुमारे सव्वाचार लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिने चोरून नेले आहेत. वर्दळीच्या रस्त्यावरील घरातील (Theft) चोरीमुळे शहरवासीयांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

दोंडाईचा शहरातील अंजुम टाकीसमोर हि घटना घडली आहे. ३० ऑक्टोम्बरच्या रात्री दहानंतर ही चोरी झाली असून किशोर रामचंद्र गारुंगे यांच्या घरातील (Dhule News) दरवाजाचा कडीकोयंडा काढून चोरटे आत शिरले. बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. यात (Gold) सोन्याची साखळी, अंगठ्या, बांगड्या, मंगळसूत्र, तीन हजारांची रोकड असा चार लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेच्या हा प्रकार लक्षात आला. घरमालक आजारी असल्यामुळे आठ दिवसांपासून अहमदनगर येथे गेले होते. बंद घर असल्याचा डाव चोरट्याने साधला. घरमालकाचे भाऊ सुभाष रामचंद्र गारुंगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. श्वानपथक, ठसेतज्ज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एम. खरात, धनंजय मोरे, मनोज ब्राह्मणे, प्रकाश भावसार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात मकरसंक्रांतीला ₹३००० जमा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

SCROLL FOR NEXT