NASHIK FAKE GODMAN DOUBLE MURDER CASE EXPOSED SHOCKING BLACK MAGIC CRIME AI
महाराष्ट्र

Shocking : भयंकर! अघोरी पूजेच्या नावाखाली जोडप्याची हत्या, मृतदेह मठ परिसरात लपवले; भोंदू बाबाच्या खुनी चेहऱ्याचं काळं सत्य समोर

Dhule Crime News : धुळ्यामध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली दोन जणांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोंदू बाबा योगेश खैरनारला अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • धुळ्यात अघोरी पूजेच्या नावाखाली दुहेरी हत्या

  • योगेश खैरनार नावाचा भोंदू बाबा अटकेत

  • मृतदेह लपवण्यासाठी निर्जन ठिकाणी पुरले

  • अंधश्रद्धेमुळे घडलेल्या गुन्ह्यांबाबत पुन्हा चिंता वाढली

भूषण अहिरे धुळे

नाशिकमधील भोंदू खरात प्रकरण ताजे असतानाच धुळ्यात आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफार्श झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. साक्री येथील निजामपूर जैताणे येथे पूजा विधीच्या नावाखाली अघोरी कृत्ये करून दोन जणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. योगेश खैरनार असे या कथित भोंदू बाबाचे नाव आहे. याप्रकरणी भोंदू खैरनारला बेड्या ठोकण्यात आल्या असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री काकुस्ते (वय २५) आणि अक्षय सोनवणे (वय २८) अशी मृतांची नावे असून, या दोघांना काही धार्मिक विधींच्या नावाखाली बोलावण्यात आले होते. आरोपी योगेश खैरनार याने अघोरी पूजा करण्याचे आमिष दाखवत त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर या दोघांची निर्घृणपणे हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह लपवण्यासाठी मठ परिसरातील एका निर्जन ठिकाणी अक्षय सोनवणे याचा मृतदेह पुरून ठेवला होता.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी परिसरात शोधमोहीम राबवली आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपीने आणखी कोणते गुन्हे केले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणामागे अंधश्रद्धा, आर्थिक व्यवहार किंवा इतर काही कारणे आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

या धक्कादायक घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी अशा भोंदू बाबांपासून सावध राहावे आणि कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाला सुरूवात

Ketan Agarwal Case: सियाच्या आई-वडिलांची कसून चौकशी, पोलिसांनी विचारलेले ९ प्रश्न कोणते?

Pune : पुणे हादरलं! विहिरीत उडी मारून महिलेने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर

Kangana Ranaut: 'मुलांच्या गुन्ह्यांसाठी पालकांना दोष देऊ...'; केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर कंगना राणौतची प्रतिक्रिया

Maharashtra politics : ठाकरे-फडणवीसांची जवळीक, सामंतांनी थेट निशाणा साधला, स्टेट्‍सची राजकीय वर्तुळात चर्चा

SCROLL FOR NEXT