Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण; पालिका प्रशासन आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमण विरोधामध्ये पालिका (Dhule) प्रशासन आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे. दरम्यान, अतिक्रमण (Dhule Corporation) काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा यावेळी उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी दिला. या मोहिमेत कोणीही बाधा निर्माण करु नये, यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. (Letest Marathi News)

धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातर्फे धुळे शहरातील मुंबई– आग्रा महामार्ग परिसरात अतिक्रमण हटविण्यास सुरवात करण्यात आली आहे. यावेळी काही नागरिक स्वतःहून अतिक्रमण काढून घेत होते. नागरिकांना महानगरपालिका अतिक्रमण निर्मल पथकाचे अधिकारी कर्मचारीही मदत करत असून धुळे महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांच्या आदेशाने शहारात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

नागरीकांची कोर्टात धाव

पालिका उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुखांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्यास सुरवात करण्यात आली. धुळे महानगरपालिका ओपन स्पेस सर्वे नंबर ४२० एक अ आणि एक ब या मोकळ्या भूखंडावर काही दिवसांपासून नागरिकांनी रहिवासी अतिक्रमण केले होते. मागील वर्षी काही अतिक्रमण या परिसरात काढण्यात आले होते. परंतु परिसरातील काही नागरिकांनी या अतिक्रमणावर ऑब्जेक्शन घेऊन कोर्टात धाव घेतली होती. परंतु कोर्टातर्फे अतिक्रमणाला स्टे न मिळाल्याने पुन्हा या परिसरात अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : परभणीत रोजगार हमीतील संतप्त मजुरांनी पंचायत समिती कार्यालयात प्राशन केलं कीटकनाशक

Madhuri Dixit: क्या खुब लगती हो; धकधक गर्लचा ट्रेडिशनल लेहंगा लूक!

Lok Sabha Election 2024 : नवी मुंबईत भाजपमध्ये अचानक राजीनामासत्र; निवडणूक धामधुमीत असं काय घडलं?

DJ ban in Buldana : महाराष्ट्रातला हा जिल्हा झाला 'डीजेमुक्त'; बुलडाण्यात थेट बंदी, कारणेही तशी गंभीर

Pakistan Squad: पाकिस्तानकडून १८ सदस्यीय संघाची घोषणा! टीम इंडियाला नडणाऱ्या गोलंदाजाचं कमबॅक

SCROLL FOR NEXT