Dhule accident
Dhule accident  Saam TV
महाराष्ट्र

Dhule Accident Update: नदीपात्रात पडलेला ट्रक 12 तासांनंतरही सापडेना; महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती

साम टिव्ही ब्युरो

>> भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे तापी नदी पुलावर अपघातानंतर ट्रक थेट नदीपात्रात कोसळला आहे. 12 तास उलटून गेले असले तरीही ट्रकचा अद्याप सापडलेला नाही. मात्र बुडालेल्या ट्रक संदर्भात महत्त्वपूर्ण कागदपत्र पोलिसांच्या हाती लागले आहेत.

कागदपत्रांमधील माहितीनुसार, ट्रकचालकाचं नाव दीपक कुमार (वय 40) असून तो राजस्थानच्या कोटा येथील आहे. ट्रक चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांच्या हाती लागलं आहे.  (Breaking Marathi News)

शिरपूर सावर्दे पुलावर सोमवारी रात्री क्रुझर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात 20 ते 25 जखमी झाले आहेत. त्यापैकी किरकोळ जखमी असलेल्यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले असून अद्यापही चार जण जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला. बुडालेला ट्रक अद्यापही नदीपात्रातच आहे.यामध्ये ट्रक चालकासह आणखी किती जण आहेत याचा अद्यापही अंदाज लागू शकलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

Today's Marathi News Live: भिवंडी तालुक्यातील प्लास्टीक कंपनी ला भीषण आग

Chennai Shocking Video: दुसऱ्या मजल्याच्या छतावर अडकले बाळ... पाहणाऱ्यांचाही श्वास अडकला; रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

Sharad Pawar: मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार

RCB Vs GT : विल जॅक्सचं ४१ चेंडूत तुफानी शतक; बेंगळुरूचा गुजरातवर रेकॉर्डब्रेक विजय

SCROLL FOR NEXT