Shindkheda Accident Saam tv
महाराष्ट्र

Shindkheda Accident : गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी

Dhule News : दोंडाईचाकडून भरधाव वेगाने येत असलेल्या गॅस सिलिंडरच्या ट्रकने दुचाकीला जोराने धडक दिली. या धडकेत मोटारसायकल चालक तरुण कैलास लांडगे जागीच ठार झाला,

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : सोनगीर- दोंडाईचा राज्य महामार्गावर चिमठाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळ दोंडाईचाकडून (Dhule) सोनगीरकडे जाणाऱ्या गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या (Accident) अपघातात मालपूर (ता. शिंदखेडा) येथील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. (Live Marathi News)

धुळे जिल्ह्यातील मालपूर (ता. शिंदखेडा) येथील कैलास गोपीचंद लांडगे (वय ४३) व रमेश भाईदास भलकार (वय ४२) हे दोघे मोटारसायकलने मालपूर येथून चिमठाण्याकडे जात होते. दरम्यान चिमठाणे येथील बुराई नदीवरील पुलाजवळच त्यांचा अपघात झाला. दोंडाईचाकडून भरधाव वेगाने येत असलेल्या गॅस सिलिंडरच्या ट्रकने दुचाकीला जोराने धडक दिली. या धडकेत मोटारसायकल चालक तरुण कैलास लांडगे जागीच ठार झाला, तर रमेश भलकार जखमी झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातात जखमीस (Songir) सोनगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनगीर- दोंडाईचा राज्य महामार्गावर ४ फेब्रुवारीला दुपारी साडेचारच्या सुमारास मोटारसायकला धडक देणाऱ्या गॅस सिलिंडर वाहतूक करणारे वाहन पळवून नेले. मात्र ग्रामस्थांनी सोनगीर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर वाहन रात्री शिंदखेडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT