Nagpur Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Dhule Accident News: धुळ्यात भीषण अपघात! ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले; दोघांचा दुर्दैवी अंत, १ जखमी

Gangappa Pujari

भूषण अहिरे, धुळे|ता. ९ ऑगस्ट २०२४

राज्यातील अपघातांचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. आज सकाळीच पालघरमध्ये एका कारने दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली. अशातच धुळे जिल्ह्यातून एक मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे. ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे तालुक्यातील चित्तोड गावानजीक दुचाकी व ट्रॅक्टरचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर चालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याचे समोर आले असून या अपघातामध्ये दुचाकी वरील दोघेजण जागीच मृत्युमुखी पडले आहेत, तर एक जण जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी, तसेच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातातील जखमीला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज सकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली. सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या वेळी महामार्ग दोन्ही बाजुंनी बंद ठेवण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

SCROLL FOR NEXT