Dhule Saam Impact News Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact News: अपघाताचे कारण मांडताच झोपलेल्या टोल प्रशासनाला आली जाग

अपघाताचे कारण मांडताच झोपलेल्या टोल प्रशासनाला आली जाग

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर येथील सावर्दे पुलावर झालेल्या अपघातास (Accident) कारणीभूत ठरत असलेला टोल प्रशासनाचा हलगर्जीपणाची बातमी लावल्यानंतर त्या ठिकाणी काही वेळातच सामच्या बातमीचा दणका बघावयास मिळाला. गेल्या कित्येक दिवसांपासून पुलाच्या मधोमध खोदून ठेवलेला खड्डा बातमीच्या प्रसारणानंतर टोल प्रशासन खडबडून जागे होत खड्डा बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली. (Breaking Marathi News)

सावर्दे पुलावर रात्रीच्‍या सुमारास क्रुझर व ट्रकचा अपघात झाला. टोल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचे उघडकीस आले असून, आता काथडा तोडून नदीपात्रात बुडालेला ट्रक काढण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

खड्डा बुजवायला सुरवात

सावर्दे पुलावर टोल प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे नेहमीच या ठिकाणी वाहनांचे अपघात होत असल्याच्या घटना उघडकीस आले आहे. या संदर्भात रात्री झालेल्या अपघातानंतर साम टीव्हीने या सर्व प्रकाराचा ग्राउंड रिपोर्ट प्रसारित केला. यानंतर स्थानिक टोल प्रशासनाला खडबडून जाग आली. काही तासातच टोल प्रशासनाने हा खड्डा बुजवण्याच्या हालचालींना सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मोबाईल मार्केटला झटका! युद्धामुळे 25 हजार कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT