Shindkheda Accident Saam tv
महाराष्ट्र

Shindkheda Accident : अनियंत्रित डंपरने बसस्थानकात उभ्या प्रवाशांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

Dhule news : डंपर भरधाव वेगाने नेला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर हा ट्रक थेट खलाणे येथे असलेल्या बसस्थानकात शिरला. यात बसस्थानकाचा शेड देखील पूर्णपणे तुटला आहे

भूषण अहिरे

धुळे : भरधाव वेगाने जाणाऱ्या मुरूमने भरलेला डंपर भरधाव वेगाने येत अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला आहे. डंपरने बसस्थानकात उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान रेती व मुरुमाने भरलेले डंपर रस्त्यावरून भरधाव वेगाने नेले जात असतात. यामुळे अनेक अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. अशाच पद्धतीने मुरूम ने भरलेला डंपर भरधाव वेगाने नेला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर हा ट्रक थेट खलाणे येथे असलेल्या बसस्थानकात शिरला. यात बसस्थानकाचा शेड देखील पूर्णपणे तुटला आहे. 

दोघांचा जागीच मृत्यू 

ट्रक अनियंत्रित झाल्याने ट्रक चालकाने बसस्थानका जवळ गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडले. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलेचा देखील समावेश आहे. दरम्यान जखमीना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातग्रस्तांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

संतप्त नागरिकांचे रस्त्यावर आंदोलन 

अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये थरकाप उडाला होता. नागरिक मदतीसाठी धावून गेले. मात्र तेथील दृश्य पाहून अपघातानंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये 24 वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करताना काय काळजी घ्याल?

SCROLL FOR NEXT