Dharashiv Yadshi News  AI Image
महाराष्ट्र

Dharashiv : धाराशिवमध्ये ३ पिढ्यांचा अंत, दिवाळीची रात्र काळरात्र ठरली, ६ जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं कारण आलं समोर

Dharashiv Fire Tragedy Update News : धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात मध्यरात्री भीषण आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. एक जण बचावला असून अग्निशमन दलाच्या उशिरा येण्यावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात मध्यरात्री घडलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण सुदैवाने बचावला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा पोहोचल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येडशी येथील एका किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. मध्यरात्री अचानक घराला आग लागली. काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले. घरात झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. धुरामुळे गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेतून एक व्यक्ती बचावल्याची माहिती आहे.

आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आले. मात्र, अग्निशमनची गाडी उशिरा पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच गाडीमध्ये पुरेसे पाणी नव्हते आणि डिझेलचीही कमतरता होती. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वतः डिझेल उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. अग्निशमन कर्मचाऱ्यांकडे आवश्यक सुरक्षा साहित्यही नव्हते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

अग्निशमन दल वेळेत पोहोचले असते, तर काहींचे प्राण वाचले असते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या पणत्यांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धाराशिव शासकीय रुग्णालयात चार जणांना मृत अवस्थेत आणण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्रतापसिंह पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. येडशीतील दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. धाराशिव जिल्ह्यात तेरखेडा येथे मोठे फटाका केंद्र असताना दिवाळीच्या काळात आगीचा धोका लक्षात घेऊन अग्निशमन दलाने पुरेशी तयारी ठेवणे गरजेचे होते. मग आवश्यक साधनसामग्रीशिवाय अग्निशमन दल कसे काम करत होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Crime News: लातूरमध्ये माणुसकीला काळिमा! प्रॉपर्टीसाठी बापानेच ७ वर्षांच्या मुलाची केली हत्या

Stroke : स्ट्रोक येण्याच्या १ महिन्याआधी शरीरात दिसतात 'ही' ५ धोक्याची लक्षणं! दुर्लक्ष करणे पडेल महागात

Maharashtra News Live Update: त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी देवस्थानांना धमकी; मंदिरांची सुरक्षा वाढवली!

मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचं सहापदरीकरण होणार! MMRDC चा प्लान; तब्बल 6 हजार कोटींचा खर्च?

Clove : तुम्ही दररोज १०-१२ लवंगा खाताय का? सावधान! आरोग्यासाठी योग्य की अयोग्य, वेळीच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT