Saam Tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Temple : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ

Dharashiv Tuljapur : तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला सुरुवात झाली आहे. पंचक्रोशीतील महिला सेवेसाठी दाखल होत असून २२ सप्टेंबर रोजी देवी सिंहासनावर विराजमान होणार आहे.

Alisha Khedekar

  • तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ झाला.

  • पंचक्रोशीतील महिला गाद्यांचा कापूस पिंजण्यासाठी व सेवेसाठी दाखल झाल्या.

  • २२ सप्टेंबर रोजी देवी सिंहासनावर विराजमान होणार आहे.

  • यंदा देवीच्या साड्या दहा वेगवेगळ्या रंगांमध्ये सजणार आहेत.

गणरायाच्या विसर्जनानंतर भक्तांना शारदीय नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ होणार. या पार्श्वभूमीवर देवीच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी पंचक्रोशीतून महिला दाखल होणार आहेत.

देवीच्या मंचकी निद्रेला आज रात्रीपासून सुरुवात होईल. देवीच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्यासाठी शहरासह पंचक्रोशीतील महिला मंदिरात दाखल होतात. आराध्याच्या मेळ्यात कापूस पिंजला जातो. तर तुळजापुरातील सेवेकरी पलंगे कुटुंबीय देवीच्या पलंगाची स्वच्छता करतात. मंचकी निद्रा संपवून देवी २२ सप्टेंबर रोजी सिंहासनावर विराजमान होईल. त्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ होईल.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी ही एकमेव चल मूर्ती असून वर्षभरात २१ दिवस पलंगावर असते. त्यापैकी एक शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वी मंचकी निद्रा पार पडते.दरम्यान तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. देवीच्या छबिना मिरवणूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना कलर देण्यात येत आहे.

यावर्षी देवीच्या साड्यांचे रंग कोणते ?

  • पहिला दिवस - पांढरा

  • दुसरा दिवस - लाल

  • तिसरा दिवस - निळा

  • चौथा दिवस - पिवळा

  • पाचवा दिवस - हिरवा

  • सहावा दिवस - राखाडी

  • सातवा दिवस - नारंगी

  • आठवा दिवस - मोरपीस

  • नववा दिवस - गुलाबी

  • दहा दिवस - जांभळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toe Rings Design: नव्या नवरीसाठी जोडव्यांच्या सुंदर आणि नाजूक 5 डिझाईन्स

Face Yoga Benefits: फेस योगा करण्याचे फायदे काय? कधी करावा फेस योगा?

Maharashtra Live News Update: गडचिरोलीत शासकीय आश्रम शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना विषबाधा

विमान कसं आणि कुठं कोसळलं?...बारामती एअरपोर्टवर हेलिकाॅप्टरमधून उतरताच शरद पवारांचा पहिला प्रश्न

Matching Blouse: साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग ब्लाऊज कसा निवडायचा?

SCROLL FOR NEXT