Dharashiv Crime Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv: गाडीला कट का मारला? गळ्यावर सत्तुर ठेवून तरुणाने डॉक्टरला धमकावले, घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये भयंकर घटना घडली. गाडीला कट का मारला? या रागातून दोन तरुणांनी डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी दिली. एका तरुणाने डॉक्टरच्या गळ्यावर सत्तुर ठेवत धमकावले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

धाराशिवमध्ये डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिवमध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टराच्या गळ्याला सत्तुर लावून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही संपूर्ण घटना शासकीय रुग्णालयाच्या परिसरात घडली. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करणाऱ्या राजस्थान येथील डॉक्टराच्या गळ्याला सत्तुर लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. गाडीला कट का मारला? म्हणत आरोपीने डॉक्टराच्या गळ्याला सत्तुर लावला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, धाराशिव शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये असणाऱ्या झाडाजवळ डॉक्टर उभा राहिला आहे. त्याचवेळी त्याठिकाणी दोघेजण येतात. यामधील एका तरुणाच्या हातामध्ये सत्तुर आहे. हा तरुण डॉक्टरला पकडतो आणि त्याच्या गळ्यावर सत्तुर ठेवून धमकावतो. या घटनेचा हा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गाडीला कट लागल्याच्या रागातून आरोपींनी थेट सत्तुर गळ्यावर ठेवत डॉक्टरला धमकावले. हिमांशु सत्यनारायण व्यास असे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव आहे. हिमांशु एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करतात. धाराशिवच्या शासकिय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना सतत नागरिकांकडून त्रास दिला जातो. अशामध्ये या रुग्णालयातील डॉक्टरांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT