Dharashiv Kala Kendra Prostitution Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : गिऱ्हाइक आला की मुली दाखवायचा, पसंत आली की...कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

Dharashiv Kala Kendra Prostitution Crime News : धाराशिवमध्ये कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवल्याचा आरोप समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • धाराशिवमध्ये अवैध रॅकेट उघड

  • महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप

  • ९ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

धाराशिवमध्ये कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून महिलेने तक्रारीत तिला मारहाण केल्याचे म्हटले आहे. कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश या महिलेने केला असुन आपबिती सांगितली आहे.

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, ती विवाहित होती मात्र नवरा तीला दारू पिऊन मारहाण करत होता. पीडित महिलेने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल तिची मैत्रीण सोनाली वाघ हिला सांगितलं. त्यानंतर पतीच्या त्रासाला कंटाळुन ती आळणी येथील पिंजरा कला केंद्रात आली. तिथे सोनालीने पीडितेची ओळख मालकीण असलेल्या कविता कोळपेकर आणि मॅनेजर असलेल्या सचिन चंद्रकांत कापसे याच्याशी ओळख करून दिली. तेथे सचिन कापसे हा ग्राहक आले की त्यांना मुली दाखवायचा आणि ग्राहक मुली पसंद करुन त्यांना वेश्या कामासाठी कला केंद्र बाहेर घेऊन जायचे.

या सगळ्या घटनांचा क्रम पीडित महिलेच्या लक्षात आला होता. त्यामुळे तिने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वेश्या व्यवसायाची मालकीण कोळपेकरने पीडितेला मारहाण केली. धाराशिव जिल्ह्यातील पिंजरा, महाकाली आणि साई कला केंद्र या 3 तर लातुर जिल्ह्यातील बुधडा कला केंद्रात बळजबरीने डांबून ठेवुन मारहाण करण्यात आली.

तसेच पैशाच्या बदल्यात तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले असल्याचं तिने म्हटले. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून वेश्या व्यवसायाची पोल खोल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांवरती धाराशिवच्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा ते चिखली रस्त्यावर डिझेलसाठी वाहनाच्या रात्रभर रांगा

Petrol Diesel Price Today : पेट्रोल डिझेलच्या किमतीत दहा दिवसात तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना मोठा फटका; आजचा दर किती ? जाणून घ्या

मोठी बातमी! 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक दीपकेंना ठार मारण्याच्या धमक्या

Quick Breakfast Recipes : ना गॅसची गरज ना जास्त वेळ, झटपट बनणाऱ्या 'या' ५ रेसिपी नाश्त्याला ट्राय करा

Pravin Tarde- Deool Band 3 : राघव शास्त्रीला स्वामींचा अमेरिकेत फोन; 'देऊळ बंद ३' येणार, गश्मीर महाजनीची दमदार एन्ट्री | VIDEO

SCROLL FOR NEXT