Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv : अतिवृष्टीमुळे नुकसान, कर्जफेडीची विवंचना; तरुण शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

Dharashiv News : सलग झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अर्थात शेतातून उत्पन्न घटल्याने डोक्यावर कर्ज कसे फेडायचे याची चिंता लागून आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व कर्जबाजारी असल्याने भूम तालुक्यातील हिवरा येथील अल्पभूधारक असलेल्या तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. यामुळे कुटुंबियांवर मोठे आभाळ कोसळले आहे. 

सलग दोन आठवडे राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे होत्याचे नव्हते केले आहे. पुराच्या पाण्यात संसार वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. कर्ज घेऊन शेतीत पिकांची लागवड केली. मात्र पावसामुळे सर्वच उध्वस्त झाले असल्याने शेतकऱ्यांच्या हातात शून्य उत्पादन आहे. यामुळे शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. 

गळफास घेत संपविले जीवन 

दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हिवरा येथील बंडू वसुदेव जगदाळे (वय ३७) या अल्पभूधारक शेतकऱ्याने नैराशेतून मध्यरात्री शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सतत पडणारा पाऊस अतिवृष्टीने शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांच्या शेत नदीच्या जवळच असल्याने ३ तीन एकर सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. यामुळे कर्ज कसे फेडायचे या नैराशेतून शेतामधील वडाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे

अतिवृष्टीमुळे घर, अन्नधान्य गेले वाहून 

अतिवृष्टीमुळे राहतं घर, जनावरे व अन्नधान्य वाहून गेल्याने शेतकऱ्याचे २५ लाखाचा नुकसान झाले आहे. परंडा तालुक्यातील सिरसाव गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे राहतं घर तसेच पाच म्हशी, दोन गाई, पाच हजार कडबा या सर्व संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे. घर पाण्यात गेलेल्या नागरिकांना शासनाने दहा हजाराची मदत जाहीर केली ती सुद्धा अजून पर्यंत पोहोचली नाही. तर कोणताही शासकीय अधिकारी घरापर्यंत पोचला नाही अशी खंत सिरसाव गावातील पूरबानीत धन्यकुमार पाटील यांनी व्यक्त केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Delhi Bomb Blast Update: बॉम्बस्फोट प्रकरणी NIA ला मोठं यश; उमरसोबत कट आखणाऱ्या i20 कारच्या मालकाला अटक

SCROLL FOR NEXT