Tuljabhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Dharashiv News : सध्या सुट्टीचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरात येत आहेत

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनास आलेल्या महिला भक्ताला सुरक्षा रक्षकाकडून (Dharashiv News) धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. मंदिर संस्थानच्या बिव्हीजी ग्रुपच्या सुरक्षा रक्षकाकडून धक्काबुक्की केल्याचे यात दिसून येत आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Mandir) रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. दरम्यान सध्या सुट्टीचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक तुळजाभवानीच्या (Tulja Bhavani) दर्शनासाठी तुळजापूरात येत आहेत. या भाविकांना चांगले दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या सुरक्षा रक्षकाकडूनच महिला भाविकांसी धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. 

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भक्ताला मंदिर संस्थानच्या सुरक्षा रक्षकाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे. यावरून मंदिरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन सदरील सुरक्षा रक्षकावर तुळजाभवानी मंदिर प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे. या झालेल्या प्रकारामुळे भाविकांत व पुजाऱ्यात मोठी नाराजी पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडाच्या वादाचा दुसरा अंक; शिवसेना भाजपामध्ये सुप्त संघर्ष

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

SCROLL FOR NEXT