India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

Shreya Maskar

तेलंगणा

मेडक किल्ला हा भारतातील तेलंगणा राज्यातील मेडक जिल्ह्यात, हैदराबादपासून वायव्य दिशेला सुमारे ९६ ते १०० किलोमीटर अंतरावर, मेडक शहराच्या मध्यभागी स्थित आहे.

Telangana | google

मेडक किल्ला

मेडक किल्ला पूर्वी 'मेथुकु दुर्गम' या नावाने ओळखला जायचा. मेडक किल्ल्याची निर्मिती १२ व्या शतकात काकतीय शासक प्रताप रुद्र ( 'रुद्र देव') यांच्या राजवटीत झाली.

Medak Fort | google

प्रवेशद्वार

१२ व्या शतकात काकतीय राजवंशाने बांधलेला हा मेडक किल्ला खडकाळ टेकडीवर टप्प्याटप्प्याने असलेल्या तीन वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक प्रवेशद्वारांसाठी ओळखला जातो.

entrance | google

प्रथमा द्वारम

प्रथमा द्वारम हे पहिले मुख्य प्रवेशद्वार असून, त्यावर 'गंडभेरुंड' (दोन डोकी असलेला पौराणिक पक्षी) हे बोधचिन्ह कोरलेले आहे.

Prathama Dwaram | google

सिंह द्वारम

सिंह द्वारम हे दुसरे प्रवेशद्वार आहे. याच्या दगडी कमानीच्या वरच्या भागात डरकाळी फोडणाऱ्या दोन उग्र सिंहांचे शिल्प कोरलेले असल्याने याला हे नाव पडले आहे.

Singh Dwaram | google

गज द्वारम

गज द्वारम हे शेवटचे प्रवेशद्वार (हत्तींचे प्रवेशद्वार) आहे. याच्या दोन्ही बाजूंना एकमेकांत गुंतलेल्या दोन हत्तींची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत.

Gaj Dwaram | google

निसर्ग सौंदर्य

मेडक किल्ल्यावर पोहोचण्यासाठी ५०० हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात. ९० मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणाहून मेदक शहराचे ३६०-अंश विहंगम दृश्य दिसते.

Beauty of nature | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : समुद्राच्या लाटांपासून जंगलाच्या कुशीत, कोकणातील 'हे' ५ किल्ले आहेत खूपच खास

Konkan Forts | AI PHOTO
येथे क्लिक करा...