Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : शेतावर रात्री पिकाला पाणी द्यायला गेला, अचानक बिबट्या आला; शेतकऱ्यासोबत पुढे घडलं ते भयंकर

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील विजय माने असे घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विजय माने हे शेतात रात्रीची लाईट असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : अन्नपाण्याचा शोधात वन्य प्राणी वस्तीच्या दिशेने येत आहेत. यामुळे शेतशिवारात तसेच गावांमध्ये बिबट्या, वन्य प्राण्यांकडून हल्ले केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच घटना धाराशिवच्या भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. यात शेतात जात असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील विजय माने असे घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विजय माने हे शेतात रात्रीची लाईट असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान बिबट्याने तीन वेळेस विजय माने यांच्यावर हल्ला केला. विजय माने हे ओरडल्याने शेजारील शेतात असलेले सागर माने त्यांच्याकडे धावत गेल्याने व बॅटरी चमकवल्याने बिबट्या तिथून निघून गेला. त्यामुळे विजय माने त्यांचा जीव वाचला.

शेतकऱ्याची प्रकृती गंभीर 

दरम्यान विजय माने या शेतकऱ्यावर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला असुन या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. त्यांना भूम येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन प्रकृतीच्या स्थितीची गंभीरता पाहता त्यांना पुढील उपचारासाठी बार्थी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर मागील दहा- पंधरा दिवसापासून भूम तालुक्यासह शहराजवळ बिबट्या वावरत व दिसत असल्याचं नागरिकांमधून बोलले जात आहे. तरी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

भंडाऱ्यात वाघाने केली गाईची शिकार
भंडारा
: भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त असलेल्या सितासावांगी परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरु असून वन्य प्राण्यांकडून हल्ले करण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहे. याच दरम्यान रात्री दरम्यान शिकारीच्या शोधात आलेल्या वाघाने गोठ्यातील गाईवर हल्ला चढवून एका गाईचा फडशा पाडला. तर दुसरी गाय जखमी झाली. या घटनेमुळे पशुपालकांसह शेतकरी व नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. 

घटना उघडकीस येताच गावकऱ्यांत दशहतीचे वातावरण पसरले. माहिती मिळताच नाकाडोंगरी विभागातील वनरक्षक अशोक मेश्राम यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेत पशुपालकांचे मोठे नुकसान झाले. वाघाच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊन याचा फटका शेतकरी, पशुपालक व सर्वसामान्यांना बसत आहे. वनविभागाने वाघाला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT