Akkalkuwa News : बुरशी लागलेल्या मिठाईची विक्री; अक्कलकुवा शहरातील धक्कादायक प्रकार समोर

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील खेतेश्वर स्वीट हॉटेल मधील हा घाणेरडा प्रकार समोर आला आहे. शहरातील काही नागरिकांनी खेतेश्वर स्वीट हॉटेलवरून मिठाई खरेदी करून घरी नेली.
Akkalkuwa News
Akkalkuwa NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात बुरशी लागलेल्या मिठाईची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकांनी हि मिठाई घरी नेल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील खेतेश्वर स्वीट हॉटेल मधील हा घाणेरडा प्रकार समोर आला आहे. अक्कलकुवा शहरातील काही नागरिकांनी खेतेश्वर स्वीट हॉटेलवरून मिठाई खरेदी करून घरी नेली. यानंतर ग्राहकाने घरी जाऊन मिठाईचा बॉक्स उघडला असता या मिठाई मधून उग्र स्वरूपाचा वास आला. यामुळे संबंधिताने मिठाई पहिली असता खराब आणि बुरशी लागलेली मिठाई असल्याचे आढलून आले. 

Akkalkuwa News
Nanded Crime News : पत्नीला नांदायला न पाठवल्याने संपवले सासूला, खूनी जावयाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ग्राहक मिठाई घेऊन पोहचले दुकानावर 
मिठाईला बुरशी लागल्याचे निर्दशनास येताच संबंधित ग्राहक मिठाईचा बॉक्स घेऊन पुन्हा त्या दुकानावर गेला. तेथे हॉटेल चालकाकडे तक्रार केल्यानंतर ग्राहकांच्या हातात असलेला मिठाईचा बॉक्स हिसकवण्याचा प्रयत्न दुकानदाराने केला. मात्र ग्राहकाने हॉटेल व्यवसायिकाला या प्रकाराबद्दल विचारणा करत जाब विचारला असताना पैसे घेऊन विषय मिटवण्याचा प्रयत्न दुकानदाराने केला. दरम्यान याबाबत तक्रार करणार असल्याचे ग्राहकाने सांगितले. 

Akkalkuwa News
Beed Crime News : आवादा ग्रीन पवनचक्की कंपनीकडे मागितली २ कोटीची खंडणी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

महिनाभरापूर्वी बनवली मिठाई 

अक्कलकुवा येथील खेतेश्वर स्वीट हॉटेल दुकानदाराकडे असलेली मिठाई ही साधारण महिना भरापूर्वी बनवली असल्याची माहिती या प्रकरणानंतर समोर आली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कुठलीही तपासणी कार्यवाही न केल्यामुळे अशा घटना घडत असल्याचं या प्रकारामुळे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com