Tulja Bhawani Temple Saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Dharashiv Tuljapur News: तुळजाभवानी देवीच्या शिखराच्या वादातून तुळजापुरात काल रात्री जितेंद्र आव्हाड यांची गाडी अडवल्याने आव्हाड समर्थक आणि भाजप कार्यकर्ते भिडले; हा वाद विकोपाला गेल्याचे पाहण्यास मिळाले होते

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिखराबाबत निर्णय प्रक्रियेस आता चांगलाच वेग आला आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने गाभाऱ्यातील शिळाना गेलेले तडे आणि सद्यस्थितीच्या केलेल्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सोपवला आहे. याच अनुषंगाने लवकरात लवकर मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाला जिल्हा प्रशासनाने घातली साद घातली आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचे मंदीर हेमाडपंथी धाटणीचं आहे. पुरातत्व खात्यानुसार हे मंदीर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन असल्याचं मानले जाते. दरम्यान तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्याचे समोर आले होते. याबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पाहणी करण्यात आली होती. यासंबंधीचा अहवाल विभागाकडून तयार करण्यात आला आहे.   

मुंबईत लवकरच बैठक 

दरम्यान महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची जिल्हा प्रशासनाला अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय पुरातत्व विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालनानंतर मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाला जिल्हा प्रशासनाने साद घातली आहे. 

आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या मुख्य शिखर हटविण्याच्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतल्याने तुळजापुरात काल रात्री चांगलाच राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या शिखराला हात लावू न देण्याची भूमिका व्यक्त केल्यानंतर भाजप आणि आव्हाड समर्थकांमध्ये चांगलीच झटपट झाली. झटापट एवढी वाढली होती की पोलिसांना मध्यस्थी करत जितेंद्र आव्हाडांच्या गाडीला वाट करून द्यावी लागली. या सर्व हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे असून शिखरासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध बिल्डरची गोळ्या झाडून हत्या केली अन् विरारमधून पळाला, कुख्यात गँगस्टरला उत्तर प्रदेशातून अटक

MNS- Shivsena: मुहूर्त ठरला! १८ डिसेंबरला होणार मनसे-शिवसेना युतीची घोषणा? राज ठाकरे- संजय राऊत यांच्यात काय चर्चा झाली?

Maharashtra Live News Update: शितल तेजवानीला बावधन दोन पोलिसांनी येरवडा कारागृहातून घेतलं ताब्यात

...तोपर्यंत पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार नाही, शिंदेंच्या शिलेदाराची खरमरीत टीका, सायकल चालवण्याचा दिला सल्ला

Top 5 Maruti Cars: उत्तम मायलेज अन् भन्नाट फिचर्स; 10 लाखाच्या आत मिळतील या Top 5 मारुती कार्स

SCROLL FOR NEXT