Kailas Patil Saam tv
महाराष्ट्र

Kailas Patil Satement: पिक विमा कंपनी अन् सरकारचे धोरण लुडो, सापसिडी खेळासारखे; ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा हल्लाबोल

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : केवळ आकडेवारी न पाहता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक परिस्थिती पाहून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा (farmer) अग्रिम पिक विमा रकमेसाठी समावेश करावा; अशी मागणी करत पिक विमा कंपनीची (Crop Insurance) अन् सरकारची धोरण लुडो आणि सापसिडीच्या खेळासारखे असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. (Latest Marathi News)

धाराशिव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. शेतीतील पिकांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. याच अनुषंगाने पीक विम्याच्या अग्रिम रकमेसाठी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र नुकसान होऊन देखील जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात पिक विम्याच्या जाचक अटीमुळे पंचनामे होत नाही. 

याच अनुषंगाने ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्र्यांकडे केवळ आकडेवारी न पाहता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक परिस्थिती पाहून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा अग्रिम पिक विमा रकमेसाठी समावेश करावा अशी मागणी केली आहे.तसेच एन डी आर एफ,एचडी आर एफ प्रमाणे पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी असे देखील त्यांनी यावेळी म्हंटलय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : मेषसह 5 राशींसाठी शनिवार ठरेल भाग्याचा, वाचा राशीभविष्य

Sanjay Raut: आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा वर नेण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप

Earbuds blast in woman ear : एअरबड्सचा झाला कानात स्फोट; महिला झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?VIDEO

Fact check : 2030 सालापर्यंत माणूस अमर होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Kriti Sanon: क्रिती सेनॉनचा स्वॅगच न्यारा, दिसते खूपच कमाल

SCROLL FOR NEXT