Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News: आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू; मारहाण करून लटकवून टाकण्याचा वडिलांचा आरोप

Dharashiv News : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू; मारहाण करून लटकवून टाकण्याचा वडिलांचा आरोप

साम टिव्ही ब्युरो

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील वानेवाडी येथील नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा (Student) संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा नैसर्गिक मृत्यू नसून मारहाण (Dharashiv News) करून मुलाला लटकवल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

प्रेम शिंदे असं मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. धाराशिव तालुक्यातील वानेवाडीमध्ये वारकरी संप्रदायाची शिक्षण देणारी नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये दहावीत शिकणारा प्रेम शिंदे याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. प्रेम शिंदे याचा मृतदेह दोरखंडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही आत्महत्या नसून आपल्या मुलाला मारहाण करून लटकवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. 

संस्थाचालक ताब्यात 

दरम्यान याप्रकरणी संस्थाचालक उंबरे महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ही आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.पोलीस या प्रकरणाचा सध्या कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलते अंबरनाथचं सौंदर्य, 'ही' ठिकाणं वीकेंडला पाहायलाच हवीत

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

Pune : पाणीटंचाईचे संकट टळले! खडकवासला धरण शंभर टक्के भरले, इतर धरणांमध्ये किती टक्के साठा? जाणून घ्या

Karishma Tanna Baby Boy: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; वयाच्या ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म

Maharashtra News Live Update: वाकड येथे नागरिकांचा भव्य आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT