Tuljapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Dharashiv News: सावत्र आईने १० वर्षीय मुलाला हौदात बुडवून मारलं; तुळजापुरातील संताजपनक घटना

Tuljapur Crime News: सावत्र आईने १० वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातून उघडकीस आली आहे.

Satish Daud

बालाजी सुरवसे, साम टीव्ही तुळजापूर

Tuljapur Step Mother killed Son

सावत्र आईने १० वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातून उघडकीस आली आहे. गाढ झोपेत असलेल्या मुलाला आईने उचलून नेत हौदात बुडवलं. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत निर्दयी आईला अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवमल्हार दयानंद घोडके (वय १० वर्ष) असं मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवमल्हार हा गुरुवारी (ता. २८) आपल्या वडिलांसोबत घराशेजारील ज्योतिर्लिंग ज्वेलर्स दुकानासमोर झोपला होता.  (Maharashtra News)

सकाळी उठल्यानंतर तो वडिलांना दिसून आला नाही. त्यामुळे दयानंद घोडके यांनी त्याचा शोध घेतला असता, शिवमल्हार याचा मृतदेह जवळच सुरु असलेल्या बांधकामावरील हौदात आढळून आला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

माञ, शिवमल्हार यांची हत्या झाली असावी असा संशय स्थानिक गुन्हे शाखेला आला. त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मृत मुलाच्या सावत्र आईला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली केली. सुरुवातीला महिलेने उडवा उडवीची उत्तरे दिली.

मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवल्या असता, आपणच मुलाची हत्या केल्याची कबुली सावत्र आईने दिली. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी आईवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: 'महिनाभरापूर्वीच ओमराजेंच्या बंडाचं प्लॅनिंग', भावानेच केला मोठा गौप्यस्फोट

Mumbai Crime: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, तो भोसकत राहिला मुंबईकर बघत राहिले

ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांबाबत पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी जमा? पाहा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कर्कीसह अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस

SCROLL FOR NEXT