Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : बिल्डिंग भाड्यानं दिली, १० लाख भाडं थकलं; मालक संतापला, थेट सरकारी कार्यालयाला ठोकलं टाळं!

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याच्या पारंडा शहरात असलेले भूमी अभिलेख कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. सरकारी कार्यालय असून देखील इमारत मालकास वेळेवर भाडे दिले जात नाही

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिवच्या परंडा शहरातील भूमी अभिलेख कार्यालय भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. या इमारतीच्या भाड्यापोटी १० लाख रुपये थकले आहे. वारंवार मागणी करून देखील भाडे मिळत नसल्याने इमारत मालकाने भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकले आहे. कार्यालय बंद असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यासह शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. 

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्याच्या पारंडा शहरात असलेले भूमी अभिलेख कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. सरकारी कार्यालय असून देखील इमारत मालकास वेळेवर भाडे दिले जात नाही. वेळोवेळी नोटीस देऊन देखील भाडे मिळत नाही. यामुळे इमारत मालक संतप्त झाला होता. या इमारत मालकाने यापूर्वी म्हणजे १२ ऑगष्टला टाळे लावले होते. त्यावेळी अधिकार्‍याने भाडे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतू २२ दिवस झाले तरी भाडे मिळत नसल्याने इमारत मालक महावीर रोकडे यांनी आज पुन्हा टाळे लावले असून भाडे मिळाल्याशिवाय टाळे काढणार नाही; अशी भूमिका इमारत मालकाने घेतली आहे.

सर्वजण गेले परत 

संतप्त इमारत मालकाने आज कार्यालयाला टाळे लावले होते. सकाळी कार्यालयात आल्यानंतर कार्यालय बंद असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यासह कामासाठी आलेल्या नागरिक व शेतकरी यांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इमारत मालक रोकडे यांच्याकडे कार्यलय उघडण्याबाबत विनंती केली. परंतू इमारत मालकाने टाळे काढले नाही; यामुळे सर्वजण परत गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT