Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation : आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; शेळ्या मेंढ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Dharashiv News : आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी व प्रमाणपत्राचे वाटप तात्काळ सुरू करण्यात यावे; यासाठी धनगर समाज (Dhangar Reservation) आक्रमक झाला आहे. हीच मागणी घेऊन हजारोच्या (Dharashiv News) संख्येने धनगर समाज बांधव शेळ्या मेंढ्यासह जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला. (Maharashtra News)

धनगर समाजाने आरक्षणासाठी (Dhangar Reservation) राज्यभरात आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनानंतर देखील राज्य सरकारकडून अद्याप निर्णय होत नसल्याने धनगर समाजाने एल्गार पुकारला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे. समाजाच्यावतीने शेळ्या मेंढ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला  धाराशिवच्या लेडिज क्लबच्या मैदानावरुन या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चक्काजाम करत घोषणाबाजी 

येळकोट येळकोट जय मल्हार.. सह आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच अशा घोषणा देत जिल्हाभरातुन हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाज बांधवांनी चक्का जाम करत जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अमलबजावणी करावी; अशी मागणी समाजबांधवांनी केली. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- उद्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

SCROLL FOR NEXT