manoj jarange patil warning to marahta leader state government on Maratha reservation  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: आरक्षणासाठी पुन्हा एल्गार; जरांगे पाटलांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरूवात!

Manoj Jarange Patil Sabha: धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या सभेने जरांगे पाटलांच्या दौऱ्याला सुरूवात होईल.

Gangappa Pujari

बालाजी सुरवसे, प्रतिनिधी

Manoj Jarange Patil News:

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन रान पेटले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटलांच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरूवात होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या सभेने या दौऱ्याला सुरूवात होईल.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. जरांगे पाटील हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांची पहिली सभा धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv) वाशी शहरातील जगदाळे मामा हायस्कूल च्या मैदानावर सकाळी ११.३० होईल.

तसेच दुपारी २ वाजता भुम तालुक्यातील ईट या गावात जरांगे पाटील सभा घेणार आहेत. दुपारी ४.३० वाजता परंडा शहरातील पंचायत समितीच्या पाठीमागील मैदानावर भव्य सभेत ते मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी केली आहे.

इगतपुरीमध्ये विराट सभेचे आयोजन..

2 नोव्हेंबर रोजी इगतपुरी तालुक्यातील शनीतफाटा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १०१ एकरवर ही सभा होणार असून ७० एकरवर पार्किंरची सोय करण्यात आली आहे. तर ५ हजार स्वयंसेवकाची फौज तैनात राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम..

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालण्यातील अंतरवालीत आमरण उपोषण छेडल होतं. मात्र सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेत २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT