Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv : शेती वाहून गेली, पिकांची नासाडी; जिवापाड जपलेली जनावरं विकण्याची शेतकर्‍यांवर वेळ

Dharashiv News : पावसामुळे अगदी हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली असून हि मदत प्रत्यक्षात कधी मिळणार हे सांगणे कठीण आहे. अर्थात शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. संपूर्ण शेतातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेती वाहुन गेली, पिक मातीमोल झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दिवाळीचा सण साजरा कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. यामुळेच दिवाळीच्या तोंडावर जिवापाड जपलेली जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

राज्यात साधारण दीड- दोन महिने सतत पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते झाले आहे. शेतातील पिके सडली असून हातात काहीच उत्पन्न नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतीसाठी केलेला खर्च निघणे देखील कठीण झाले आहे. काही शेतकऱ्यांचा तर केलेला खर्च देखील वाया गेला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

सण उत्सवाच्या तोंडावर संकट 

पावसामुळे अगदी हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली असून हि मदत प्रत्यक्षात कधी मिळणार हे सांगणे कठीण आहे. अर्थात शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आगामी काही दिवसात दिवाळीचा सण असून शेतकरी कुटूंबासाठी या सणावर देखील सावट आहे. यामुळे वर्षातून एकदा येणारा सण साजरा करण्यासाठी गुर विक्रीला काढली आहेत. 

पशुधन विक्रीसाठी बाजारात गर्दी 

नुकसान लाखांचं अन् मदत १० हजाराची कस भागवायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ आली आहे. धाराशिवच्या करजखेडा येथील बाजार पशुधन विकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे. साम टिव्हीशी बोलताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आहेत. ही जनावर नाहीत, माणंस आहेत. पण काय करावं; दावनीला बांधलेली जनावरे सोडुन बाजारात विकायला आणावी लागत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kurdai Bhaji: थोडं तिखट, झणझणीत आणि घरगुती चवीचं काहीतरी खायचंय? मग ही मराठवाडा स्टाईल कुरडई भाजी होऊन जाऊदेत

Maharashtra Live News Update: कन्या सेरेना मस्कर हिने युथ एशियाई कबड्डी स्पर्धेत मिळवले गोल्ड मेडल

ISRO LVM3 Launch : भारताची ताकद वाढली, इस्रोची 'बाहुबली' झेप! LVM3 रॉकेटने रचला इतिहास |VIDEO

Ladki Bahin Yojana: वडील आणि पती दोघेही हयात नाहीत, लाडक्या बहिणींनी eKYC कशी करायची? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भयंकर! पोटच्या २ मुलांकडून आई वडिलांची हत्या; घरातच दोघांना संपवलं, कारण फक्त..

SCROLL FOR NEXT