Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी लाडक्या बहिणीचे तुळजाभवानीला साकडे

Dharashiv News : राज्यात विधानसभा निवडणूक नुकताच पार पडल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे यांची निवड व्हावी; यासाठी लाडक्या बहिणींनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीला साकडे घातले आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा यावेळी सहभाग होता.

राज्यात विधानसभा निवडणूक नुकताच पार पडल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालात महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यात देखील भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री भाजपचा करायचा कि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवायचे याबाबत चर्चा सुरु आहे. शिवाय यामुळे सरकार स्थापन करण्यावर देखील अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. यामुळे भाजप, शिंदे सेना व अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे. 

बिहार पॅटर्न राज्यात राबवा 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यात महायुती निवडणूक लढल्याने राज्यात महायुतीचं सरकार आलं. त्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी; अशी इच्छा महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या जास्त जागा असल्या तरी बिहार पॅटर्नप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे; असं मत पदाधिकारी यांनी व्यक्त केले. तर यावेळी महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT