Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News: जन्मदात्या बापाचे किळसवाणे कृत्य; लैंगिक शोषणातून अल्पवयीन मुलगी तीन महिन्याची गरोदर

जन्मदात्या बापाचे किळसवाणे कृत्य; लैंगिक शोषणातून अल्पवयीन मुलगी तीन महिन्याची गरोदर

साम टिव्ही ब्युरो

बालाजी सुरवसे

धाराशिव : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एका गावात समोर आली आहे. स्वतःच्या लेकीसोबत केलेल्या किळसवाण्या कृत्‍यातून (Crime News) अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहीली आहे. या प्रकरणी उमरगा तालुक्यातील पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Tajya Batmya)

उमरगा तालुक्यातील एका गावात ४५ वर्षीय मजुर त्याची पत्नी व १५ वर्षीय मुलगी वास्तव्यास होते. पती व पत्नी दोघे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र व्यसनाच्या आहारी गेलेल्या नराधम बापाने पत्नी घरात नसताना पोटच्या मुलीवर झडप मारली. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास बरे होणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीने कुठेही वाच्चता केली नाही. त्यामुळे सलग तीन महिने हा नराधम बापाच्या कृत्याला तिला सामोरे जावे लागले.

अन्‌ धक्‍कादायक प्रकार आला समोर

दरम्यान पोटात दुखु लागल्याने तिला दवाखान्यात नेले असता ती तीन महिन्याची गरोदर असल्याची माहीती पुढे आली. त्यानंतर बापाने गावातील दोन मुलांनी हा प्रकार केल्याचे पोलीसांना सांग असे मुलीना सांगितले. तशी तक्रार देखील देण्यात आली. मात्र पोलीसांना दिलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर मुलीची महीला पोलीसांनी विश्वासात घेवुन विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान नराधम बापाची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT