Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv : स्मशानभूमी जागेच्या वादातून दोन गटात तुफान राडा; पोलीस गाड्यांवरही दगडफेक, दहा जण जखमी

Dharashiv News : स्मशानभूमीच्या जागेच्या वादावरून दोन दिवसांपासून वाद सुरु होता. यावर तोडगा काढण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीदरम्यान अचानक दगडफेक करण्यात आली दगडफेकीत पोलिसांसह आठ ते दहा लोक जखमी

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : आदिवासी समाजाला स्मशानभूमीसाठी जागा दिलेली असताना वेगळीकडे अंत्यसंस्कार केल्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले. या वादातून जोरदार राडा झाला. यात पोलिसांच्या गाड्यांवर देखील दगडफेक करण्यात आली असून यात पोलीसांसह दहा ते बारा जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणानंतर गावात तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

धाराशिवच्या मोहा गावात स्मशानभूमीच्या वादातून दोन गटात वाद उद्भवून जोरदार राडा झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली होती. स्मशानभूमीच्या वादातून दोन दिवसापासून गावात वाद दुमसत होता. दरम्यान आज सकाळी गावकरी व आदीवासी समाजाची वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकी बोलावण्यात आली होती. मात्र बैठकीत तोडगा निघण्यापूर्वीच ठिणगी पडली आणि या दरम्यान जमावाने दगडफेक करण्यास सुरवात केली. 

दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण

दरम्यान दोन गटातील राड्यात गावात असलेल्या पोलिसांच्या पथकावर देखील दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये चार ते पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच गावातील काही नागरिक देखील जखमी झाले आहेत. आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीवरूच्या जागेवरून झालेल्या वादा नंतर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तर यानंतर गावात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. 

पोलीस प्रशासन गावात ठाण मांडून 

मोहा गावात स्मशानभूमीच्या वादातून दोन गटात झालेल्या राड्यानंतर गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. गावात शंभर ते दीडशे पोलिसांचा फौजफाटा तैनात असून दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आला आहे. स्मशानभूमीच्या जागेवरून झालेल्या वादात दगडफेक करण्यात आल्याने महसूल आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी गावात ठाण मांडून असून या प्रकरणी अद्याप कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बापाची मुलाने केली हत्या, पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

Beed : सत्तेचा मलिदा मिळाल्यावर लाडक्या बहिणी अपात्र असल्याचा साक्षात्कार; शरद पवार गटाच्या हेमा पिंपळे यांचा आरोप

Pune Mhada Lottery: पुण्यात स्वस्तात मस्त घर, म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Thalipeeth : कागदासारखं पातळ अन् मऊसूत गावरान चवीचं थालीपीठ; रेसिपी आताच नोट करा

Stale Rice Benefits: रात्रीचा शिळा भात फेकून देताय? थांबा... वाचा फायदे

SCROLL FOR NEXT