Online Fraud Saam tv
महाराष्ट्र

Online Fraud : बँक खाते हॅक करत २४ लाख रुपये लंपास; खाते अपडेटिंगच्या बहाण्याने दूध डेअरी चेअरमनची फसवणूक

Dharashiv News : धाराशिवच्या भूम तालुक्यातील जेजला गावातील येडेश्वरी दूध डेअरीचे चेअरमन तानाजी दत्तु भोसले यांची सदर प्रकरणात फसवणूक झाली आहे. भोसले यांना बँक खाते अपडेटसाठी फ्रॉड कॉल आला

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील एका दूध डेअरीच्या चेअरमनला गंडविण्यात आले आहे. त्यांचे बँक खाते अपडेट करण्याचे सांगत खाते हॅक करण्यात आले होते. यानंतर हॅकरने त्यांच्या खात्यातून तब्बल २४ लाख ४७ हजार रुपये इतकी रक्कम ऑनलाईन काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 

धाराशिवच्या भूम तालुक्यातील जेजला गावातील येडेश्वरी दूध डेअरीचे चेअरमन तानाजी दत्तु भोसले यांची सदर प्रकरणात फसवणूक झाली आहे. भोसले यांना बँक खाते अपडेटसाठी फ्रॉड कॉल आला. यात समोरच्या बोलणाऱ्या व्यक्तीने आपण बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून बँक खाते अपडेट करण्याचे सांगितले. याकरिता भोसले यांच्याकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती घेतली. 

फाईल डाउनलोड करताच बँक खाते हॅक 

यानंतर व्हॉट्सॲप वरून बँकेची एक फाईल पाठवून ती मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार भोसले यांनी सदरची फाईल इन्स्टॉल करताच त्यांचे बँक खाते हॅक करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या भोसले यांना काही कळण्याच्या आतच सायबर चोरट्यानी येडेश्वरी दूध डेअरीच्या बँक खात्यातून तब्बल २४ लाख ४७ हजार रुपये ऑनलाइन काढून खाते रिकामे करण्यात आले. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट अडकले 

दरम्यान फसवणुक झाल्याचे लक्षात येताच भोसले यांनी तातडीने धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकलेले दुधाचे पेमेंट द्यायचं कसं हा प्रश्न आता ऑनलाइन फसवणुकीमुळे चेअरमन भोसले यांच्यापुढे पुढे निर्माण झाला असून दूध उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT