Bribe Case Court Judge Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case Court Judge : एक हजार रुपयांसाठी ७ वर्षांच्या कारावाससह १० हजार रुपयांचा दंड; शाळेच्या दाखल्यासाठी घेतली होती लाच

Dharashiv News : तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : काम करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेण्याचे प्रकार समोर आल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल होऊन कारवाई केली जात असते. मात्र (Dharashiv News) धाराशिवमध्ये शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी १ हजार रुपयांची लाच (Bribe) घेतल्याप्रकरणी न्यायालयाने ७ वर्ष कारावासासह १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  (Live Marathi News)

शाळा सोडल्याचा मुळ दाखला व इयत्ता दहावीचे मुळ मार्क मेमो देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील लक्ष्मीबाई बाबुराव पाटील कृषी तंञनिकेतनमधील कृषी सहायक अशोक दल्लु राठोड यांनी २०१५ मध्ये तक्रारदाराकडुन एक हजार रुपयांची लाच घेतली होती. या प्रकरणी (Tuljapur) तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

९ वर्षांनी लागला निकाल 

न्यायालयात प्रकरणाबाबत सुनावणी सुरु होती. दरम्यान न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्याने (Court Judge) जिल्हा सत्र न्यायालयाने २८ मार्च रोजी अशोक राठोड यांना सात वर्षे कारावास व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणाचा निकाल तब्बल ९ वर्षांनी लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT