Manasvi Choudhary
गणपतीच्या पूजेत केळीच्या पानाला विशेष महत्व असेत. गणपती बाप्पाचे नैवेद्यासाठी केळीच्या पानाचा वापर करतात.
केळीच्या पानावर नैवेद्य ठेवण्याची परंपरा असण्यामागची परंपरा कशी सुरू झाली आहे. ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
हिंदू शास्त्र पद्धतीनुसार, केळीचे झाड पवित्र आणि शुभ मानले जाते. केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केळीच्या खांबांनी किंवा पानांनी केली जाते.यामुळेच देवाचे नैवेद्य अर्पण करण्यासाठी केळीचे पान हे सर्वात पवित्र मानले जाते.
बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिक किंवा कागदी पत्रावळींवर केमिकल्स असू शकतात, मात्र केळीचे पान नैसर्गिक असते.
केळीच्या पानावर नैसर्गिक रीतीने 'पॉलिफेनॉल' नावाचे घटक असतात, जेव्हा केळीच्या पानावर गरम-गरम मोदक किंवा नैवेद्य ठेवला जातो, तेव्हा पानातील हे पौष्टिक घटक अन्नात मिसळतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
नैवेद्य दाखवल्यानंतर किंवा जेवण झाल्यावर केळीचे पान मातीत टाकल्यास ते मातीत मिसळते यामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.