Manasvi Choudhary
आजकाल महिलांना जड दागिने घालण्याऐवजी हलके आणि आकर्षक दागिने घालायला आवडतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला ३ ग्रॅम सोन्यामध्ये सुंदर मंगळसूत्र डिझाईन्स सांगणार आहोत.
रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिसमध्ये तुम्ही सहज घालू शकता असे हलक्या वजनाचे सुंदर, आकर्षक आणि डिझायनर मंगळसूत्र खरेदी करू शकता.
काळ्या मण्यांमध्ये लहान पण आकर्षक डिझायनर डायमंड किंवा सिथेटिक खड्याचे पेंडंट असलेले हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
अस्सल मराठमोळा लूक आवडत असेल, तर ३ ग्रॅममध्ये अगदी लहान आकाराच्या सोन्याच्या दोन वाट्या आणि मध्ये काळे-सोनेरी मणी असलेली मंगळसूत्र निवडा.
आजकालच्या तरुण विवाहित महिलांसाठी 'इन्फिनिटी' किंवा 'हार्ट' शेपमधील मिनिमलिस्ट पेंडंटचे मंगळसूत्र घालयला आवडतात ते तुम्ही निवडू शकता.
फुलांच्या डिझाईनचे लहान सोन्याचे पेंडंट त्यात साधी काळ्या मोत्यांची चेन असा पॅटर्न तुम्ही निवडू शकता.
त्रिकोण किंवा चौकोनी अशा वेगवेगळ्या जिओमेट्रिक आकारांमधील सोन्यांचे मंगळसूत्र डिझाईन्स तुम्ही निवडू शकता.