Dharashiv Railway Station Saam TV
महाराष्ट्र

Dharashiv Railway Station: मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये रेल रोको; रेल्वे रुळांवर झोपून आंदोलकांची घोषणाबाजी

Rail Roko Andolan In Dharashiv: रेल्वे रुळांवर झोपून आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा आणि आरक्षण मिळवणारच अशा घोषणा दिल्यात.

Ruchika Jadhav

Dharashiv Maratha Andolan:

मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये आंदोलन सुरू आहे. मंगळवारी आंदोलकांनी रेल रोको करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मराठा आंदोलक मोठ्या संख्येने धाराशिवमध्ये दाखल झालेत. आंदोलकांनी धाराशिवमध्ये रेल रोको केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धाराशिव रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र आलेत. रेल्वे रुळांवर बसून आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा आणि आरक्षण मिळवणारच अशा घोषणा दिल्यात. आंदोलन आणखी चिघळूनये यासाठी रेल्वे स्थानकात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त करण्यात आलाय.

मराठा आरक्षणासाठी काल बीडमध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघळलं. काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्यामुळे शासनाने बीडसह धाराशिवमध्ये संचार बंदीचे आदेश दिले आहेत. संचार बंदीचे आदेश असतानाही धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत. भुम शहरातील गोलाई चौक येथे रस्त्यावर उतरत टायर जाळून देखील घोषणाबाजी करण्यात आलीये. तसेत धाराशिवमध्ये सलग तिसऱ्या दिवशी बस सेवा विस्कळीत आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील बस सेवा विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात बसवर दगडफेकीच्या घटनांसोबतच काल सायंकाळी उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे एक बस पेटवून देण्यात आली. याच अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून ही बस सेवा बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात शुकशुकाट पहिला मिळतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT