बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात साधरण १५ लाख वृक्षांची लागवड करण्याचा मानस या उपक्रमातून करण्यात आलाय. उपक्रमात मात्र एक विचित्र घटना घडलीय. या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना छत्र्या देण्यात येणार होत्या. छत्र्याचं वाट प होणार होतं. मात्र विद्यार्थ्यांच्या छत्र्यांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच डल्ला मारल्याचं पाहायला मिळालं.
जिल्ह्यातील विवध भागातून आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत विद्यार्थ्यांच्या छत्र्या नेल्या. कोणी मोटरसायकलवर तर कोण आपल्या कारच्या डिकीमध्ये तीन-तीन, चार-चार छत्र्या ठेवत होते. एकाबाजुला वृक्षरोपणाचा उपक्रम राबवला जात असल्यानं त्याचे कौतुक केलं जात होतं. परंतु विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या छत्र्या युवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच पळवल्याने त्यांच्यावर टीका देखील होतेय.
विद्यार्थ्यांना वाटल्या जाणाऱ्या छत्र्या कार्यकर्ते घेऊन जात असल्याचं पाहून अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. कार्यकर्त्यांचे हे वागणं पाहुण अनेकांनी आपल्या कपाळावर हात मारला. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव हा वृक्षरोपणाचा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात १५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आले होते. त्यांच्या हातून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांना सहभाग घेतला होता. या उपक्रमाच्या निमित्त युवा शिवसेनेकडून छत्र्याचे वाटप केलं जाणार होतं. उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना छत्र्या वाटल्या जाणार होत्या. काही विद्यार्थ्यांनी छत्र्या देण्यात आल्या, मात्र ज्या छत्र्या उरल्या होत्या त्या छत्र्यावर कार्यकर्त्यांनी डल्ला मारला. प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांसोबत फोटो सेशन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्र्या पळविल्या. छत्र्या मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. आपल्या ऐवजी कार्यकर्ते छत्र्या घेऊन जात असल्याचं पाहून अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
ठाकरे परिवाराकडे मुंबईची पंचवीस वर्षापासून सत्ता होती. तर राज्यात अडीच वर्ष सत्ता होती, त्यावेळी त्यांनी काही केलं नाही. मराठी कुटुंबांना मुंबईतून बाहेर करण्याचे कटकारस्थान त्यांच्याच अनुयायांनी केलं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी मराठी माणसांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची टीका निरर्थक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.