Dharashiv Flood Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv Flood: धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार, भीषण पूरस्थिती; मात्र जिल्हाधिकारी डान्स करण्यात दंग; पाहा VIDEO

Dharashiv Collector Dance Video: धाराशिवमध्ये भीषण पूरस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले आहे. जिल्ह्यात परिस्थिती भयंकर असताना देखील जिल्हाधिकारी मात्र डान्स करण्यात दंग असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

  • मोठ्या प्रमाणात शेती, घरे आणि जनावरांचे नुकसान झाले आहे.

  • जिल्ह्यात भीषण पूरस्थिती असताना देखील जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी डान्स करण्यात दंग असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून नेटकरी संतप्त झालेत.

भरत नागणे, धाराशिव

धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्हायात पूरामुळे परिस्थिती खूपच भयंकर आहे. अतिवृष्टी आणि पूरामुळे धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान झाले. त्याचसोबत जनावरं आणि अनेक नागरिक वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात पूरस्थिती असताना देखील जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी डान्स करण्यात दंग असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून धाराशिवमधील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा डान्स करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुळजाभवानी मंदीर संस्थानाच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी डान्स करताना दिसले. देवीच्या गाण्यावर जिल्हाधिकारी टाळ्या वाजवत ड्रान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

धाराशिव जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे नागरीक हैराण असताना जिल्हाधिकारी डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने चर्चेंला उधाण आले आहे. जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात, शेतकरी अडचणीत आहेत. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांचे बेजबाबदार वर्तन असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर नागरीकां दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

SCROLL FOR NEXT