Dharashiv Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: धाराशिव हादरले! नवऱ्याचे बायकोवर कोयत्याने सपासप वार, शिर धडावेगळं केलं

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये एका व्यक्तीने बायकोची कोयत्याने वार करत हत्या केली. आरोपीने बायकोचे शिर धडावेगळं केलं. या घटनेमुळे धाराशिव हादरले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Priya More
  • धाराशिवमध्ये नवऱ्याने बायकी निर्घृण हत्या केली

  • कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोवर कोयत्याने वार केले

  • या हल्ल्यात बायकोचा जागीच मृत्यू झाला.

  • नवऱ्याने बायकोचे शिर धडावेगळे केले

बालाजी सुरवसे, धाराशिव

धाराशिवमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोयत्याने सपासप वार करत नवऱ्याने बायकोला जागीच संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने बायकोचे शिर धडावेगळं केलं. या घटनेमुळे धाराशिव हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या कनगरा येथे ही धक्कादायक घटना घडली. कोयत्याने वार करत आरोपीने बायकोचे शिर धडावेगळं केलं. आरोपीने कोयत्याने बायकोच्या गळा, छाती आणि मानेवर वार केले. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. या वादातून संतप्त होत नवऱ्याने हे भयंकर कृत्य केले. राजेंद्र ढोबळे असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मृत महिलेच्या भावाने केली आहे.

अमरावतीच्या दर्यापूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर २ तरुणांनी घरात घुसून सपासप वार केले. मुलीच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. दर्यापूरच्या आनंदनगर परिसरात ही घटना घडली. २ दिवसांपूर्वी याच परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

आज पुन्हा २ तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्या मानेवर आणि हातावर वार करून तिला जखमी केले आहे. या धक्कादायक घटनेनंतर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईने दर्यापूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी जखमी मुलीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र या धक्कादायक घटनेनंतर अमरावतीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu: 'माझे सिक्स पॅक पुन्हा...'; 'बेबी बंप' फ्लाँट करत समांथा रुथ प्रभूने केली खास पोस्ट

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी

Petrol Price India: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल- डिझेल झालं स्वस्त; १ लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

मंगळसूत्र ब्रेसलेटच्या युनिक 5 डिझाईन्स, ऑफिस आणि डेलीवेअरसाठी एकदम बेस्ट

Brain tumor symptoms: डोळ्यांना सतत धुरकट दिसतंय? चष्म्याची गरज समजून दुर्लक्ष करू नका, हे ब्रेन ट्युमरचं पहिलं गंभीर लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT