Dharashiv Dhananjay Sawant Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : कंटेनरची जोरदार धडक, गाडीचा चेंदामेंदा! तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Dharashiv Accident News : भिगवणजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरची जोरदार धडक बसली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Alisha Khedekar

  • भिगवणजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात

  • धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनरला कंटेनरची धडक

  • गाडीचे मोठे नुकसान, पण जीवितहानी टळली

  • पुत्र, चालक व सुरक्षारक्षक किरकोळ जखमी

  • भाजप प्रवेश कार्यक्रमावरून परतताना घटना

Dharashiv Dhananjay Sawant Accident News : धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मुंबई येथे धनंजय सावंत यांच्या पत्नीसह समर्थकांनी शिवसेनेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रवेशाचा हा कार्यक्रम आटोपून परतत असताना भिगवणजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान, धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत गाडीचा चक्काचूर झाला असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र धनंजय सावंत यांचे पुत्र आणि चालक व सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या नेर तालुक्यात उष्माघाताने ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

HSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 'इतके' टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Heart blockage treatment: हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलं अँजिओप्लास्टी करण्याची गरज कधी भासते

Fish bone stuck in throat: घशामध्ये माशाचा काटा अडकल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT