Deepak Borhade addressing supporters during hunger strike for ST reservation in Jalna. Saam Tv
महाराष्ट्र

Dhangar Protest: ...तर फसवणाऱ्यांची घरं जाळा, सरकार खबरदार नसेल तर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा, या धनगर नेत्याचं चिथावणीखोर वक्तव्य

Deepak Borhade Dhangar ST Reservation Protest: जालना येथील धनगर नेते दीपक बोऱ्हाडे ST प्रवर्गासाठी आरक्षणाची मागणी करत आहेत. २४ तारखेपर्यंत सरकारने खबरदारी घेतली नाही तर समाजाने कठोर पावले उचलावीत, असा त्यांनी इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

जालना येथील धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे गेल्या ५ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. बोऱ्हाडे यांनी धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आज उपोषणस्थळी भेट देण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते आले होते आणि त्यांनी दीपक बोऱ्हाडेला पाठिंबा दर्शवला. यावेळी बोऱ्हाडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना चिथावणीखोर वक्तव्य केले.

त्यांनी सांगितले की, माझा श्वास २४ तारखेपर्यंत सुरू राहील. २४ तारखेला धनगर समाजाचा इशारा मोर्चा आहे. या मोर्च्यानंतर देखील सरकारने खबरदारी घेतली नाही तर धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घर जाळून टाका. २४ तारखेनंतर नेपाळमध्ये जे झाले नाही, ते महाराष्ट्रात घडवा. बोऱ्हाडे यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार टीका केली होती.

त्यानंतर जालन्याहून परतत असताना पुन्हा मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी देत काळे झेंडे दाखवले. जालना येथील मंठा दुसऱ्यांदा मराठा आंदोलकांनी सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

Maharashtra Live News Update: दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी

Ind Vs Pak : आधी टेन्शन वाढवलं, नंतर टीम इंडियानं डाव सावरला, पाकिस्तानकडून भारताला इतक्या धावांचं आव्हान

Maharashtra Politics: मुंडेंना मंत्रिपदाची इच्छा? मी रिकामा बसलोय, जबाबदारी द्या' धनंजय मुंडेंनी मनातलं सांगितलं|VIDEO

SCROLL FOR NEXT